मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नाशिकच्या उपमहानिरीक्षक पथकाची धाडसी कारवाई …

नाशिकच्या पोलीस उपमहानिरीक्षकच्या भरारी पथकाची तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यात नाशिक उपमहानिरीक्षकाच्या भरारी पथकाने तालुका व शहर पोलिसांच्या मदतीने सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई करीत दोन टँकर सह लाखों रुपये किमतीचा हजारो लिटर स्पिरीट साठा जप्त केल्याची कारवाई शुक्रवारी सायंकाळी केली.सदर कारवाई मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील दहिवद शिवारात हॉटेल करणीकृपा जवळ करण्यात आली आहे.काल गुरुवारी नाशिक येथील उपमहानिरीक्षक पथकाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी 9 लाख 27 हजार 680 रुपये किमतीची बिअरची अवैध वाहतूक रोखून कारवाई केली होती त्यानंतर शुक्रवारी पुन्हा सायंकाळी लाखोंचा स्पिरिट साठा जप्त केला त्यामुळे नाशिकच्या पथकाची तालुक्यात सलग दोन दिवस धडक कारवाया केल्या आहेत.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावरून अवैध रित्या स्पिरिट साठा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती उपमहानिरीक्षक पथकातील पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाल्यावरून शुक्रवारी सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास पथकासह शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय सुरेश शिरसाठ यांच्या पथकासह दहिवद शिवारातील हॉटेल कर्णींकृपा लगत सापळा रचून अवैध स्पिरीट साठा वाहतूक करणाऱ्या 2 टँकरवर कारवाई केली आहे.सदर कारवाईत पथकाने टँकरसह लाखो रुपये किमतीचा हजारो लिटर स्पिरिट साठा ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात उशिरा पर्यत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.सदर कारवाई उपमहानिरीक्षक पथकाचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील ,शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख,सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्यासह पोना पंकज पाटील नरेंद्र शिंदे,अमित रनमळे,स्वप्नील बांगर,आदी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली.

WhatsApp
Follow by Email
error: