मुख्याध्यापक व शिक्षकांची सहविचार सभा संपन्न..

बातमी कट्टा:- सावळदे येथे शिक्षक सहविचार सभा संपन्नदिनांक 26 जुन रोजी आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालय सावळदे येथे गटशिक्षणाधिकारी एस.सी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर बीट क्र 2 चे शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली सावळदे केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांची सहविचार सभा ही कोरोना नियमांचे पालन करत आयोजित करण्यात आली.यावेळी सावळदे केंद्राचे केंद्रप्रमुख रवींद्र सोळंके,खाजगी संस्थेचे मुख्याध्यापक,विषय साधनव्यक्ती अनिल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.


              सर्वप्रथम आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर जोशी यांनी सभेचे प्रास्ताविक करत कोरोना काळात विद्यालयाद्वारे राबवत असलेल्या विविध उपक्रमांची तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी ऑनलाईन अध्ययन अध्यापन याबाबत माहिती दिली.
साधनव्यक्ती अनिल चव्हाण यांनी शिक्षकांना ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण देतांना येणाऱ्या अडचणी तसेच  राबवायच्या नाविन्यपूर्ण उपक्रमां विषयी माहिती दिली.केंद्रप्रमुख रवींद्र सोळंके यांनी केंद्रात राबवत असलेल्या शाळा बंद पण  शिक्षण सुरू या विषयी शाळा व वर्ग निहाय आढावा घेत चर्चा व मार्गदर्शन केले शिक्षकांनी ऑनलाईन सुविधा उपलब्ध नसल्यास ऑफलाईन पद्धतीने गल्लीमित्र पालक यांच्या मदतीने प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण द्यायचे आहे असे सांगितले तसेच दैनंदिन अभ्यासमाला, विविध लाभाच्या योजना, कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची माहिती, गृहभेटी,विध्यार्थी स्वाध्याय, शालेय पोषण आहार लाभ देणे,कोरोना विषयक जनजागृती आदींबाबत चर्चा केली शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुमावत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी आदेशीत केलेल्या 30 मुद्यांवर चर्चा करत सर्व बाबींची तात्काळ पूर्तता करण्याच्या तसेच कोरोना परिस्थिती लक्षात घेता वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासंबंधी सूचना दिल्या.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने  शिक्षण द्यावयाचे असल्याने त्या बाबत नियोजन ,शालेय परिसराची स्वच्छता व सुशोभीकरण, धोकेदायक इमारती जवळ फलक लावणे, गणवेश लाभ,शिक्षकांची शालेय उपस्थिती,विद्यार्थी आधार,सरल प्रणाली माहिती, शालेय अभिलेखे, आदींविषयी चर्चा करत मार्गदर्शन केले.व सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
सभेसाठी विद्यालयाचे शिक्षक अग्रवाल व इतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.
   याप्रसंगी सावळदे केंद्रांतर्गत सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: