मोटरसायकलीने जात असतांना झाड कोसळले,अंगावर झाड पडल्याने शिक्षकाचा मृत्यू

बातमी कट्टा:- वादळी वाऱ्याने लिंबाचे झाड कोसळून मोटरसायकलीने जाणाऱ्या शिक्षकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर झखमी झाल्याची घटना आज दि 10 रोजी सायंकाळी घडली असून जखमीवर धुळे येथे उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात अचानक जोराने वादळी वारा सुरु झाला.यात झाडाखाली दबल्याने शिक्षकाचा मृत्यू झाला तर त्यांच्या मोटरसायकलवर असणाऱ्या एकाला गंभीर दुखापत झाल्याने धुळे येथे उपचारासाठी हलवण्यात आले.   येथील एन एस पिटी पाटील माध्यमिक विद्यालयाचे माध्यमिक शिक्षक वैभव वसंत दसपूते हे आपल्या मोटरसायकलीने जात होते त्यांच्या सोबत मोटरसायकलीवर अहमद मोहमद पठाण हे देखील होते. मोटरसायकलीने जात असतांंना पिंपळनेर नवापूर रस्त्यालगत असलेल्या सामोडे चौफुली जवळ त्यांच्यावर लिंबाचे झाड कोसळले.यात शिक्षक वैभव दसपूते यांचा मृत्यू झाला तर अहमद मोहमद पठाण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर धुळे येथे उपचार सुरु आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: