बातमी कट्टा:-मोटरसायकलीने दोघे मित्र घरी जात असतांना उड्डाणपूलावर भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून यात दोन्ही तरुण जागीच ठार झाले.यातील एक पुलावर तर दुसरा उड्डाणपूलाच्या खाली फेकला गेल्याने मृत्यू झाला आहे. रात्रीच्या सुमारास अपघात घडल्याने अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील दत्तावायपूर येथील राकेश प्रताप खैरणार वय २३ व दिपक साहेबराव शिरसाट वय २० हे दोघेही मित्र नरडाणा येथे आले होते.दि २४ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास राकेश आणि दिपक हे दोघेही मित्र नरडाणा येथून दत्तवायपूर येथे आपल्या गावी मोटरसायकलीने जात असतांंना नरडाणा जवळील रेल्वे उड्डाणपूलावरून जात असतांंना अज्ञात वाहनाने धडक दिली.या भीषण अपघातात राकेश हा उड्डाणपूलाच्या खाली कोसळला तर दिपक हा मृतावस्थेत आढळून आला आहे. रात्रीच्या सुमारास घडलेला हा अपघाताचे कारण समजू शकलेले नाही.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नरडाणा पोलीस स्टेशनचे चंद्रकांत पाटील यांच्या पथक दाखल झाले होते.