बातमी कट्टा:- मोटरसायकलीने घरी जात असतांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 42 वर्षीय इसमाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडली आहे. मोटरसायकलीवर सोबत असलेल्या 10 वर्षीय मुलगा जखमी झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार काल दि 9 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला.शिरपूर पळासनेर येथील हिम्मतसिंग प्रल्हादसिंग सिसोदिया हे मोटरसायकली वरून पळासनेर गावातील एका मुलाला पोहचवण्यासाठी जात असतांना मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र 3 वर अन्नपुर्णा हॉटेल जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलीला धडक दिली.यात हिम्मतसिंग सिसोदिया यांचा मृत्यू झाला.त्यांना उपस्थितीतांनी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.
मयत हिम्मतसिंग सिसोदिया वय 42 हे पळासनेर गावाचे जवाई होते.त्यांचे मुळगांव राहुरी (अहमदनगर) येथील आहे. ते हॉटेल व्यवसाय सांभाळण्यासाठी पळासनेर येथे आल्याचे सांगितले जात आहे.आज सकाळी हिम्मतसिंग सिसोदिया यांचा मृतदेह राहुरी( अहमदनगर) येथे पाठविण्यात आला.