बातमी कट्टा:- शिरपूर शहादा रस्त्याजवळ स्त्री जातीचे नवजात मृत अर्भक आढळल्याची खळबळजनक घटना घडली आहे.घटनेची माहिती शहर पोलीसांना मिळाल्यानंतर शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पथक दाखल होऊन अर्भक शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहादा रस्त्यावर वघाडी हद्दीत कर्मवीर पेट्रोल पंप आणि शुभाष नगरच्या दरम्यान रस्त्याच्याकडेला निंबाच्या झाडाजवळ स्त्री जातीचे मृत अर्भक आढळल्याची घटना घडली.घटनेची माहिती पोलीसांना मिळताच घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल होऊन चौकशी करण्यात आली अर्भक जवळ प्लॅस्टिक पिशवी फाटलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. पोलीसांनी मृत अर्भकाला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.पोलीसांकडून त्या रस्त्यावरील सीसीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात येत आहे.