रात्रीस खेळ चाले !! रविवारी रात्री कर्मचारी व्यतिरिक्त भूमि अभिलेख कार्यालयात गेलेला “तो” व्यक्ती कोण ?

बातमी कट्टा:- शासनाकडून शासकीय कार्यालय रविवारी बंद ठेवण्याचे आदेश असतांना रविवारीच सायंकाळी कार्यालय सुरु ठेऊन नेमकी कार्यालयात कुठली शाळा भरते ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे शासकीय कर्मचारी व्यतिरिक्त ईतरांना रविवारी का बोलवण्यात येते ? अस कोणते काम त्याच दिवशी होत असणार बर असा सवाल उपस्थित होतो.

शिरपूर शहरातील पोलीस स्टेशन शेजारी कोपऱ्यात उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय आहे. काल रविवार असतांना सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ते कार्यालय सुरु होते.बाहेरील सर्व लाईट बंद ठेऊन आत मधील एकाच रुंममध्ये उजेड दिसत होते.याबाबत पोलीसांना माहिती मिळाल्याने कार्यालयात काही चोरीचा प्रकार तर नाहीना याची शहानिशा करण्यासाठी पोलीस कार्यालयाच्या आत गेले होते.यावेळी तेथे सुर्यवंशी नामक कर्मचारी काम करत असल्याचे दिसले.याबाबत पत्रकारांना माहिती मिळाली पत्रकार देखील उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय बाहेर आले.यावेळी रविवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास कार्यालय का सुरु आहे याबाबत शिरपूर येथील भूमी अभिलेख कार्यालायाच्या वरिष्ठांना फोन वर संपर्क साधला असता रविवारी काम करण्यासाठी आमीच परवानगी दिली असल्याचे वरिष्ठ अधिकारी बाबड यांना सांगितले.

चला ठिक आहे काही कारणास्तव आपल्या अधिकारीखाली कर्मचाऱ्यांना आपण रविवारी कामासाठी येण्याची परवानगी दिली असणार मात्र त्या कर्मचाऱ्याच्या सोबत शहरातील प्रसिद्ध प्लॉट खरेदी विक्री करणाऱ्या ब्रोकरच नेमक काय काम असणार बंर ? त्यांना का रात्री शासकीय कार्यालयात बोलवले होते.त्यांचे काम होते तर ते रविवार व्यतिरिक्त ईतर दिवशी पण आले असते ना ! मग रविवारीच आणि ते देखील सायंकाळीच का आले ? असा प्रश्न उपस्थित होतो.याबाबत शिरपूर शहर पोलीसांनी नेमकी काय कारवाई केली आहे शासकीय कर्मचारी व्यरिक्त तो व्यक्ती कोण ,सायंकाळी ७ -७:३० वाजेच्या सुमारास तो व्यक्ती तेथे काय करत होता हे तपासात लवकरच उघड होईल.

WhatsApp
Follow by Email
error: