बातमी कट्टा:- दिल्ली येथे झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाचा निषेध करीत जिहादी नराधमाला भर चौकात फाशीची शिक्षा देत कठोर कार्यवाही करावी तसेच लव्ह जिहाद विषयी कठोर कायदा करण्यात यावा अशी मागणी बुधवारी शिरपूर शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटना यांनी नवेदनाद्वारे केली आहे.
हिंदू जागरण मंच,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,विश्व हिंदू परिषद, बजरंग दल,राष्ट्र सेविका समिती आदी हिंदुत्ववादी संघटनांनी आज दि 23 रोजी उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांच्याकडे निवेदन सादर केले निवेदनात म्हटले की प्रेमाचे खोटे नाटक करीत जिहादी षढयंत्रेच्या लव्ह जिहादला बळी पडलेल्या श्रद्धा वालकर हिचा आफताब पुनावाला याने केलेल्या निर्घृण हत्येचा शिरपूर येथील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त करीत आफताब पुनावाला याला भर चौकात फाशीची शिक्षा देण्यात तसेच लव्ह जिहाद विरुद्ध कायदा करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.याप्रसंगी तालुक्यातील हिंदू जागरण मंच,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,विश्व हिंदू परिषद, बजरंग दल,राष्ट्र सेविका समिती आदी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.