
बातमी कट्टा:-ती मला माफ करेल का ? या शिर्षकाखाली पत्रकार प्रशांत परदेशी यांनी आपल्या फेसबुक सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर पळासनेर येथील अपघातातील निशब्द करणारा अनुभव मांडला होता.यात कोळसापाणी ता.शिरपूर येथील चांदणी नावाच्या चिमुकलीची व्यथा मांडण्यात आली होती.एका संवेदनशील पत्रकाराने अपघातातील अनुभवलेल्या वेदनांचा हा लेख बातमी कट्टा न्युज पोर्टलने प्रकाशीत केला.या घटनेची शिरपूर महामार्ग पोलीसांकडून दखल घेण्यात आली.सामाजिक बांधिलकी जपत महामार्ग पोलीसांनी चांदणीला 51 हजारांची रक्कम मदत म्हणून दिली आहे. त्यासोबतच कोळसापाणी येथील बबीता नावाच्या चिमुकलीला देखील 30 हजार व ईतर दोघांना पाच पाच हजारांची मदत आणि शालेय साहित्य व कपडे देण्यात आले.

दि 4 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पळासनेर येथेभीषण अपघाताची घटना घडली होती.घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांसह शिरपूर व धुळे येथून पत्रकार घटनास्थळी दाखल झाले.घटनेची दिवसभर बातमी केल्यानंतर पत्रकार पत्रकार प्रशांत परदेशी पळासनेर गावाजवळील कोळसापाणी या पाड्यावर पोहचले.या अपघातात एकाच पाड्यातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची मन हेलवणारी घटना घडली होती.यादरम्यान पत्रकार प्रशांत परदेशी यांंना एक चिमुकली घराबाहेर उभी असल्याचे दिसली आणि त्यानंतर काय घडले त्यांनी ते आपल्या फेसबुक वर “ती मला माफ करेल का ?” या शिर्षकाखाली अपघातातील निशब्द करणारा अनुभव मांडला.
त्यांची ही मन हेलवणारी कहाणी बातमी कट्टा न्युज पोर्टलने प्रकाशित केली.त्यानंतर तो लेख मोठ्या प्रमाणात सर्वत्र व्हायरल झाला.घटनेबाबत अनेकांकडून दखल घेत विचारपूस करण्यासाठी बातमीकट्टा सोबत संपर्क करण्यात आला.यानंतर महामार्ग पोलीस शिरपूरचे प्रभारी अधिकारी नरेंद्र पवार यांनी तात्काळ धुळे येथील हिरे मेडिकल येथे जाऊन अपघातातील जखमींची व चांदणीची आई आणि बहिणीची विचारपूस केली.
पळासनेर अपघातात चांदनीने आपला पहिलीत शिक्षण घेणारा भाऊ गमवला तर आई आणि बहिण गंभीर जखमी झाल्याने त्यांना धुळे येथील हिरे मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर दोन वर्षापूर्वी चांदणीच्या वडीलांचे निधन झाले आहे.घरी फक्त आजी आणि आजोबा असल्याने आजी आजोबासह चांदणी राहत आहे.
रवींद्र सिंगल अपर पोलीस महासंचालक(वाहतुक)महाराष्ट्र राज्य,मोहन दहिकर पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र, प्रदिप मैराले पोलीस उप अधीक्षक,महामार्ग पोलीस,नाशिक विभाग,हेमंतकुमार भामरे पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस,धुळे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नरेंद्र पवार व उपनिरीक्षक मिर्झा यांच्यासह संपूर्ण महामार्ग पोलीस शिरपूच्या अमलदारांच्या वतीने कोळसापाणी गावाला सामाजिक बांधिलकी म्हणून एक लाखांची आर्थिक मदत केली आहे.
प्रभारी अधिकारी नरेंद्र पवार व त्यानच्या पथकाने तात्काळ चांदणी आणि तीच्या आईच्या नावाने शिरपूर भारतीय पोस्ट कार्यालयात खाते उघडून एन एस सी योजनेअंतर्गत खात्यात चांदणीच्या नावे 51 हजारांची रक्कम पाच वर्षाच्या मुदतीवर जमा केली आहे.तर या अपघातात बबीता पावरा हिचे वडील आणि भाऊचा मृत्यू झाल्याने तीच्या नावे देखील भारतीय पोस्ट कार्यालयात खाते उघडून 30 हजारांची रक्कम एन एसी सी योजनेंतर्गत पाच वर्षाच्या मुदतीसाठी ठेवण्यात येणार आहे.
दि 8 रोजी महामार्ग पोलीस शिरपूरचे प्रभारी अधिकारी नरेंद्र पवार,उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा यांच्यासह संपूर्ण अमलदार पथक कोळसापाणी येथे अपघातात मृत झालेल्यांच्या घरी सांत्वनासाठी पोहचले होते.यावेळी चांदणीच्या नावे असलेले 51 हजारांचे पोस्ट कार्यालयातील एन एस सीचे कागदपत्रे, कपडे,शालेय साहित्य चांदीणीला यावेळी देण्यात आले तर बबिता हिच्या आईकडे देखील 30 हजारांची रक्कम,शालेय साहित्य व कपडे देण्यात आले.तर ईतर दोन कुटुंबीयांना प्रत्येकी पाच हजारांची मदत करण्यात आली.महामार्ग पोलीसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल सर्वत्र महामार्ग पोलीसांचे कौतुक होत आहे.