वाहनाच्या धडकेत मृत्यू…

बातमी कट्टा:- शिरपूर शहादा रस्त्यावर अर्थे वाघाडी दरम्यान सोमवारी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाचे दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला आहे.या अपघातात दुचाकीवरील 60 वर्षीय वृद्ध जागीच मयत झाला आहे.

भटू बाबुराव गुरव वय 60 राहणार वाघाडी तालुका शिरपूर असे मयताचे नाव आहे.भटू बाबुराव गुरव हे सोमवारी 27 डिसेंबर रोजी सकाळी वाघाडी कडून अर्थे कडे जीजे 05 एल ई 7957 या क्रमांकाच्या दुचाकीवरून जात असतांना 7:30 वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात भटू बाबुराव गुरव यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जी डी पावरा व पोकॉ गणेश सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मृतदेह वाहनाने उपजिल्हा रुग्णालयात हलविला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: