बातमी कट्टा:- शेतात काम करत असतांना विज कोसळून मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना शिरपूर तहसील कार्यालय मार्फत शासनाकडून 4 लाखांचा धनादेश मदत स्वरूपात प्रदान करण्यात आला आहे.तहसीलदार आबा महाजन यांनी मृत शेतकऱ्याच्या घरी जाऊन ही मदत दिली आहे.
शिरपूर तालुक्यातील ताजपूरी येथील शेतकरी गोपीचंद सुकलाल सनेर हे शेतात काम करत असतांना त्यांच्यावर अचानक विज कोसळली होती.त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले होते.घरातील आधारस्तंभ व कर्ता पुरुष गेल्याने संपूर्ण कुटुंबाला कुठलाही आधार उरलेला नव्हता.
याबाबत महसूल विभागाकडून तहसीलदार आबा महाजन यांनी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व्हावी म्हणून शासनाच्या देय सानुग्रह अनुदानातून 4 लाखांची मदत कुटुंबीयांना देण्यात आली.शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन यांच्यासह मंडळाधिकारी प्रशांत ढोले,तालठी रिजवान खान आदी जणांनी मयत शेतकरी गोपीचंद सनेर यांचे घर गाठत त्यांच्या पत्नी रेखाबाई गोपीचंद सनेर यांना 4 लाखाचा धनादेश सुपूर्द केला.यावेळी तहसीलदार आबा महाजन यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.मयत शेतकरी गोपीचंद सनेर यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आधार मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.