बातमी कट्टा:-शिरपूरचे प्रशिक्षणासाठी असलेले छोटे विमान चोपडा नजीक आसलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील रानतलाव परिसरातील ध्वज बरडी या उंच भागात आज दुपारी कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.यात एक प्रशिक्षक पायलट ठार झाले आहेत. तर एक महिला प्रशिक्षणार्थी जखमी झाली असून उपचारासाठी दाखल करण्यात आले.जंगलात विमान कोसळल्याने नागरीकांनी गंभीर महिला प्रशिक्षणार्थीला झोळी करून बाहेर आणले व उपचारासाठी दाखल करण्यात आले.

शिरपूर येथील एस.व्हि.के.एम,स चे विमान उडाण प्रशिक्षण केंद्रातील विमानाने आज दुपारी प्रशिक्षणासाठी उडाण घेतले होते.यावेळी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ते विमान चोपडा तालुक्यातील वर्डी गावापासून 10 किमी अंतरावर असलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील रानतलावात परीसरातील ध्वज बरडी असलेल्या उंच भागात विमान कोसळले,जवळ असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आवाज आला मात्र नेमके काय घडले कोणालाही कळु शकलेले नव्हते अखेर काही शेतकरी घटनास्थळी दाखल झाले तेव्हा संपूर्ण विमानाचे चेंदामेंदा झाल्याचे दिसून आले.घटनास्थळी महिला प्रशिक्षार्थी विमानात जखमी अवस्थेत अडकलेल्या अवस्थेत दिसून आल्या तर एक पुरुष पायलटचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले घटनास्थळी यावेळी तहसीलदार अधिकारी दाखल झाले.सदर विमान हे जंगलातील उंच भागात कोसळल्याने त्या ठिकाणी घटनास्थळी नागरिकांनी महिला प्रशिक्षणार्थीला गंभीर अवस्थेत झोळी करुन जंगलाच्या बाहेर काढून उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या विमानात असलेल्या नुरुल अमीन या पायलटचा मृत्यू झाला आहे तर महिला प्रशिक्षणार्थी अंकिता गुजर हे गंभीर जखमी झाले असून उपचार सुरु असल्याची माहिती प्राप्त झाले आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार विमानाचा पुर्णता चेंदामेंदा झाला आहे.