
बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील ग्रुपचे मित्र व विविध पुरस्कारांनी सन्मानित पर्यावरण प्रेमी व्यक्तिमत्व शिवाजी राजपूत यांच्या पुरस्कारात वाढ झाली असून त्यांना आता नव्याने राष्ट्रीय प्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/OWqKwBlc2-o?si=Plv3Q0pO7EunuEyA
वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांना दिल्ली येथील सोने की चीडिया या संस्थेने सामाजिक कार्याची दखल घेउन त्याना इपोरिया बेक्वेट हॉल येथे बॉलीवूड अभिनेत्री दिव्या दत्त यांच्या हस्ते दि. 24/2/2024 रोजी पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी अभिनेत्री निनू भट यांनी त्यांचे स्वागत केले. व अभिनेत्री दिव्या दत्त यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले.
व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/OWqKwBlc2-o?si=Plv3Q0pO7EunuEyA
वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांचे मागील 32 वर्षापासून पर्यावरण संवर्धन व सामाजिक क्षेत्रात प्रचंड काम असून, त्त्यांनी लाखो रुपयांची रोपे मोफत देवून पर्यावरण संवर्धनाचे काम काम केले आहे. या कार्याची संस्थने दखल घेऊन ल्यांना राष्ट्रीय प्रतिभा सन्मान पुरस्कार दिला आहे. त्यांचे या यशाचे कृषी सामाजिक आणि राजकीय क्षेत्र व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
आपल्या कार्यक्षेत्रात अभिनव काम करून वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांनी शिरपूर तालुका चा नियमित गौरव वाढवला आहे. यापूर्वी त्यांना प्रत्येकाच्या वाढदिवस साजरा करणे व वाढदिवसाला वृक्ष लागवड करणे या प्रयोगासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
व्हिडीओ बघण्यासाठी लिंकवर क्लिक करा https://youtu.be/OWqKwBlc2-o?si=Plv3Q0pO7EunuEyA