वेशांतर करुन रात्री ते एका नाल्यात जाऊन थांबले होते,आणि मग…

बातमी कट्टा:- वाळुची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी अप्पर तहसीलदार यांच्यासह महसूल कर्मचारी यांनी वेशांतर करून नाल्यात जाऊन लपून बसले.यावेळी वाळु वाहतूक करतांना वाळु ट्रॅक्टरवर शिताफीने कारवाई करत ताब्यात घेऊन 1 लाख 22 हजाराचा दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

शिंदखेडा तालुक्यातील अलाने,चिरणे,कदाने येथील बुराई नदीतून अवैध वाळूची मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक होऊन सदर वाळु दोंडाईचा भागात पाठवली जात असल्याची गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.त्यावर चोरट्या वाळु वाहतूकीवर कारवाई करण्यासाठी अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांच्यासह पथकातील तलाठी संजीव गोसावी, तलाठी कोकणी,तलाठी भगत,तलाठी माजळकर,वाहन चालक युवराज माळी आदी जण बुराई नदीतून वाळुचे वाहन कुठल्यामार्गे जात आहेत त्यावर पाळत करून रात्रीच्या सुमारास अलाने हातनूर रोडवर वेषांतर करून रोडजवळील नाल्यात बसले होते.यावेळी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास शिंदखेडा तहसील हद्दीतील अलाने गावाकडून वाळुचे ट्रॅक्टर हातनूरकडे येतांना दिसले ते ट्रॅक्टर हातनूर गावाच्या वेशीपर्यंत येईपर्यंत पाठलाग करून हातनूर हद्दीत ट्रेक्टरने प्रवेश करताच पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.

यावेळी वेशांतर केलेल्या महसूल पथकाला बघून पळापळ झाली मात्र ट्रॅक्टर ताब्यात घेत त्यावरील चालकास विचारले असता सदर ट्रॅक्टर अलाने येथील मिठेसिंग गिरासे यांचे असल्याचे सांगण्यात आले.ते ट्रॅक्टर तहसीलदार महाजन यांनी ताब्यात घेऊन चिमठाणे येथील आउट पोस्टला जमा केले व एक लाख 22 हजार दंडाची कारवाई करण्यात आली.

WhatsApp
Follow by Email
error: