बातमी कट्टा:- मनिपुर येथील बांगलादेश सीमेवर गोळीबारात जखमी झालेले आणि उपचार दरम्यान वीरमरण आलेले शहीद जवान निलेश महाजन यांच्यावर धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मंत्री आमदार जयकुमार रावलांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देतांना शहीद जवान निलेश महाजन यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत रूजू करुन घेण्याची मागणी यावेळी केली.
आज दि 28 रोजी सोनगीर येथे शहीद जवान निलेश महाजन यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय निलेश यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होता. आजी-माजी सैनिक, प्रशासकीय अधिकारी,आमदार जयकुमार रावल आणि विविध लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा अंतिम संस्कार संपन्न झाला. निलेश यांचे वडील भारतीय सैनिक होते तर त्यांचे काका बि.एस.एफ मध्ये असतांना देशासाठी शहीद झाले होते. आता निलेश महाजन यांनी आपले प्राण अर्पण केले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत रुजू करून घेण्याची मागणी आमदार जयकुमार रावल यांनी यावेळी केली आहे.
