बातमी कट्टा:- शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचलित डॉ.विजयराव.व्ही .रंधे इंग्लिश मीडियम स्कूल,च्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी चे औचित्य साधून विठुराया या वर्षी तरी शाळा लवकर सुरू व्हावी यासाठी साकडे घातले.

या प्रसंगी प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वारकरी वेशभूषा परिधान करून विठूरायाचा जयघोष करीत टाळ मृदुंगाच्या गजरात नृत्य गायन सादर केले. व अतिशय भावुक होऊन भक्तिमय वातावरणात या वर्षी तरी आमची शाळा लवकरच सुरु होऊ दे अशी विठुरायाला आर्त साद घातली.यावेळी सर्व शिक्षक वृंद भावविवश झाले.

त्याचबरोबर उर्वरित विद्यार्थ्यांनी आपल्या माता पालकांसोबत भक्ती गीतांवर आधारित नृत्य गायनाचे व्हिडिओ पाठवून वेशभूषा स्पर्धेत आपला उस्फुर्त सहभाग नोंदवला.या प्रसंगी शाळेचे ऍडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर श्री. प्रमोद पाटील सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सारिका ततार मॅडम, यांनी प्रतिमा पूजन केले. या वेळी तंत्रस्नेही शिक्षक श्री. समाधान राजपूत सर माता पालक उपस्थित होते. शाळेच्या सहशिक्षिका सौ.मनीषा पटेल व सौ. योगिता राजपूत मॅडम यांनी विठुरायाची प्रतिमा फलक लेखनातून अतिशय सुरेखपणे साकारली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.