शाळेच्या नावाखाली भलतीच “शाळा”,चौकशीत धक्कादायक प्रकार उघड

बातमी कट्टा:- काही दिवसांपूर्वी शिरपूरात मंत्री गुलाबराव पाटील एका कार्यक्रमात आले होते.त्यांनी जसे पांडुरंगांचे पंढरपूर तसे शिक्षणाचे शिरपूर असे आपल्या भाषणातून शिरपूरच्या शिक्षणव्यवस्थेबाबत कौतुक केले होते.मात्र याच शिक्षणाचे हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका संस्थेत चक्क पटावर 250 विद्यार्थी दाखविले असतांना चौकशी दरम्यान एकही विद्यार्थी हजर नसल्याचे शिक्षण विभागाला दिसून आले आहे.

हा धक्कादायक प्रकार शिरपूर तालुक्यातील हिंगोणीपाडा येथील आशितोष बहुउद्देशीय संस्था संचलित परमपूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालयातील आहे.बिरसा फायटर्स संघटनेने विद्यार्थ्यांना बनावट सह्या करून लाखो रुपये परस्पर स्वतःच्या खात्यात वर्ग करून शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवल्याची तक्रार शिक्षण विभागाला करण्यात आली होती.

तक्रारीची दखल घेत गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशी समिती नेमली आणि दि 15 सप्टेंबरला समितीने अचानक आशितोष बहुउद्देशीय संस्था संचलित परमपूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात दाखल झाले.यावेळी शाळेत पटावर २५० विद्यार्थी दाखवविले असताना प्रत्यक्षात एकही विद्यार्थी शाळेत हजर नसल्याचा धक्कादायक प्रकार पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला चौकशीत दिसून आला.

साने गुरुजी विद्यालयात पाचवी ते दहावीच्या वर्गात पटावर एकूण २५० विद्यार्थी असल्याची नोंद आहे. मात्र दि ३१ ऑगस्ट व १५ सप्टेंबरला समितीने चौकशी साठी दिली त्यादरम्यान एकही विद्यार्थी हजर नसल्याने आढळून आले.पाच शिक्षक एक शिक्षक हजर होते तर चार शिक्षक आणि दोन कर्मचारीही गैरहजर असल्याचे दिसून आले. समितीला गुणवत्ता तपासणी करता आली नाही. पायाभूत चाचणी, घटकचाचणी वेळापत्रक आदी कागदपत्रे तपासणीकामी उपलब्ध करून दिली नाहीत. 

विद्यार्थ्यांच्या खात्यात २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीत सुवर्णमहोत्सवी पोटी  २५ लाख ९ हजार ५०० इतकी रक्कम जमा करण्यात आली. त्यातील ५ लाख ६५ हजार ५०० रुपये धनादेशाने वाटप करण्यात आले. मात्र हे धनादेश क्रॉस दिले किंवा बेअरर दिल्याचा खुलासा होऊ शकलेला नाही.४८ हजार ५०० रुपये आरटीजीएस प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. तब्बल १८ लाख ९५ हजार ५०० रुपये रोख स्वरूपात वाटप केल्याचे रजिस्टरवर नोंदण्यात आहे. 

समितीने ३१ ऑगस्टला पालक आणि विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून खात्री केली असता काही पालकांनी अंगठ्या व स्वाक्षरी त्यांची नसल्याचे सांगितले. सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीची रक्कम आरटीजीएसने विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे शासनाचे आदेश असतानाही धनादेश व रोखीने वाटप केल्यामुळे संबंधितांनी २४ लाख ६१ हजार रुपयांचा अपहार केल्याचे प्रथमदर्शनी निरीक्षण समितीने नोंदविले आहे.या संपूर्ण धक्कादायक प्रकरणामुळे धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली असून याबाबत संबधीत अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: