शिरपूरचा “विकास” तालुक्यातील शेतकरी,आमदार कुणाल पाटील अन् आता तालुक्याचे आमदार.. “बातमीकट्टा”च्या बातमी नंतर आमदारांनी दिले निवेदन,

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील नेते मंडळींना तालुक्यातील शेतकऱ्यांची किती काळजी आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी बातमीकट्टा पोर्टलने बातमी प्रकाशीत केली होती.ज्यात आमदार कुणाल पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी बांधावर जाऊन केलेले पंचनामा तर गुरांवरील लम्पी स्किन डिसीज या आजाराबाबत लसीकरणासाठी मंत्रींकडे केलेली मागणीचा उल्लेख केला होता.हा लम्पी स्किन डिसीज आजार शिरपूर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात फैलत असतांना येथील नेते मंडळींना याबाबत काही घेन देन नसावी का ? तालुक्यातील पशुपालक हैराण झाले असतांना याबाबत तालुक्यातील नेते मंडळी चकार शब्द देखील काढतांना दिसलेले नाहीत असा उल्लेख बातमीकट्टा पोर्टलने बातमीत केला होता.याबाबत अखेर आता शिरपूर तालुक्याचे आमदारांनी या लम्पी स्किन डिसीज आजारा बाबत मंत्रींना निवेदन पाठवले आहे. योगायोग असा की “बातमी कट्टा” च्या बातमी नंतर आमदार महोदयांनी सदर निवेदन दिले आहे. आता हे निवेदन बातमी लागल्यामुळे दिले की, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या काळजीपोटी दिले हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.हो पण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी निवेदन दिले हे म्हत्वाचे आहे.

दि 26 सप्टेंबर रोजी बातमी कट्टा ने प्रकाशित केलेली बातमी..

शिरपूरचा “विकास” तालुक्यातील शेतकरी
अन् आमदार कुणाल पाटील… वाचा सविस्तर👇
https://www.batmikatta.com/शिरपूरचा-विकासशेतकरी-अन/

दि 26 सप्टेंबर रोजी बातमीकट्टा.कॉम डिजीटल पोर्टल वर शिरपूरचा “विकास”,तालुक्यातील शेतकरी अन् आमदार कुणाल पाटील या शीर्षकाखाली बातमी प्रकाशीत केली होती.या बातमीत शेतकऱ्यांना अनेक संकटांना समोरे जावे लागत आहेत. अनेक दिवसांपासून पाऊसाच्या लहरीपणामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान भोगावे लागत आहे.त्यात जनावरांना होणारा स्किन डिसीज आजारांमुळे देखील शेतकरी परेशान झालेत.मात्र असे असतांना किती नेते मंडळी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले असतील तर ते बोटावर मोजणे इतकेच म्हणावे लागेल असा उल्लेख बातमीत करण्यात आला होता.या बातमीत आमदार कुणाल पाटील नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धिर देत संबधित अधिकारीं सोबत घेऊन पंचनामा करुन घेत होते.जिल्ह्यातील पाळीव जनावरांवर मोठ्या प्रमाणात लम्पी स्किन डिसीज या आजाराचा फैलाव होत असल्याने पशुपालक व शेतकरी परेशान आहेत याबाबत आमदार कुणाल पाटील यांनी तात्काळ मंत्री सुनिल केदार यांना याबाबत लसीकरण उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.हा लम्पी स्किन आजार शिरपूर तालुक्यातील जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात फैलाव होत असतांना शिरपूर तालुक्याचे नेते मंडळी शेतकऱ्यांसाठी का धावत नाहीत ? आमदार कुणाल पाटील यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी धिर देत शेतकऱ्यांसाठी दाखवलेले प्रेम,माया हे शिरपूर तालुक्यातील नेते मंडळींना देखील येवो एवढीच अपेक्षा बातमीतून व्यक्त करण्यात आली होती.

आणि या बातमीच्या दुसऱ्या दिवशी शिरपूर तालुक्यातील आमदार काशिराम पावरा यांनी मंत्री सुनिल केदार यांना निवेदन देऊन तालुक्यातील जनावरांमध्ये वाढणाऱ्या लम्पी स्किन डिसीज आजार बाबत तातडीने नियंत्रीत आणावे अशी मागणी केल्याचे वृत्तपत्रातून बातमी बघावयास मिळाले आहे. विशेष म्हणजे यात शेतकऱ्यांना यामुळे कसा त्रास होतोय त्यांना कसा आर्थिक खर्च सोसावा लागत आहे याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

बातमीकट्टा च्या बातमी नंतर आमदारांनी शेतकऱ्यांसाठी निवेदन देणे हे कदाचित शक्य नसावे पण योगायोग असा आला की,बातमीकट्टा नंतर आमदारांनी हे निवेदन दिले आहे. असो उशिरा का असेना आमदारांनी शेतकऱ्यांसठी निवेदन दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा व पशुपालकांना मदत होईल हे नक्की !

WhatsApp
Follow by Email
error: