शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक, 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात

बातमी कट्टा:- शिरपूर येथील बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जागांसाठी आज रविवारी सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. १८ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात आहेत.शिरपूर येथील पांडू बापू माळी विद्यालयात मतदान केंद्र सुरु असून त्यानंतर लगेचच मतमोजणी करून निकालही जाहीर करण्यात येणार आहे.

येथे आठ बूथवर मतदान होणार आहे.सोसायटी मतदारसंघात एक हजार २०९, ग्रामपंचायत मतदारसंघात एक हजार ११७, व्यापारी मतदारसंघात १५८ व हमाल मापाडी मतदारसंघात ३२५ असे एकूण दोन हजार ८०९ मतदार आहेत.सकाळी 9 वाजेनंतर मतदानाला ग्रामीण भागातील गर्दी वाढली असून सकाळी आठ ते चार यावेळेत मतदान होणार आहे. सायंकाळी पाचपासून बाजार समितीच्या आरकेव्हीवाय गोदामात मतमोजणी होणार आहे.

WhatsApp
Follow by Email
error: