
बातमी कट्टा:- अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर अवजड वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक झाडाला जाऊन धडकली.डॉ जितेंद्र ठाकूर यांच्यासह ग्रामस्थांनी अपघातग्रस्त चालक आणि क्लिनर यांची भेट घेऊन विचारपूस केली.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि ३० रोजी रात्रीच्या सुमारास अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर भोरखेडा गावाजवळ एका कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला झाडाला धडकला. या अपघातात सुदैवाने चालक व क्लिनर थोडक्यात बचावले.
यावेळी होळनांथे येथील कार्यक्रमातून परत येत असतानाडॉ. जितेंद्र ठाकूर हे शिरपूरकडे येत असतांना अपघात घडल्याचे दिसले.डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी तात्काळ धाव घेत चालक व क्लिनर यांची तब्येतीची विचारपूस केली.यावेळीस डॉ जितेंद्र ठाकूर यांच्यासोबत शिवसेना उ.बा.ठा. उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपुत, नितीनसिंग राजपूत आधारसिंग राजपूत यांच्यासह भोरखेडा ग्रामस्थ मदतीस धावून आले.