बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यात सुरु असलेल्या बनावट देशी दारुच्या कारखान्यावर शिरपूर पोलीसांनी कारवाई करत सुमारे १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.स्पिरीटचा वापर करत बनावट दारु बनविण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे ए.एस.आगरकर यांना गोपणीय माहिती प्राप्त होती.या माहिती नुसार शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व शोध पथकाने शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द येथील महेंद्र भाईदास भिल याच्या घराजवळ धाड टाकली. यावेळी पोलीसांनी देशी व विदेशी दारू, लेबल, बुच, ड्रम,कॅन,पुठ्याचे खोके,कॅम्पिंग मशीन व इतर साधणे ,पिकअप व आयशर असा एकुण १६ लाख ७ हजारांचा मुद्देमालासह महेंद्र भिल याला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इंद्रसिंग ऊर्फ पिन्टु भिल रा वाडी व ईतर भागिदारांच्या मदतीने हे काम सुरु असल्याचे संशयित महेंद्र भिल याने सांगितले.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस देशमुख, सा.पोलीस निरीक्षक गणेश कुटे,शोध पथकाचे ललित पाटील, लादुराम चौधरी,हेमंत पाटील, मुकेश पावरा,गोविंद कोळी, विनोद अखडमल,प्रविण गोसावी, मनोज दाभाडे,कैलास चौधरी, स्वप्नील बांगर,अमित रणमाळे व प्रशांत पवार आदींनी कारवाई केली आहे.