शिरपूर येथील त्रिमूर्ती गणेश मंडळातर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन

बातमी कट्टा:- शिरपूर येथील भगवंत पार्क, राधेय नगर व सिसोदिया नगर यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमूर्ती गणेश मंडळाकडून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तिघं कॉलनी मिळून २००७ साली म्हणजे १३ वर्षा पूर्वी त्रिमूर्ती गणेश मंडळाची स्थापना केली ज्यात मंडळाचे अध्यक्ष कुवरसिंग चव्हाण व उपाध्यक्ष राजू धनगर हे काम पाहतात.

दर वर्षी या मंडळातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी देखील रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची, गीत गायन स्पर्धा, अहिराणी नाटिका इ. कार्यक्रम राबविण्यात आले होते.

रांगोळी स्पर्धेदरम्यान घरोघरी अंगणात रांगोळी काढण्यात आली. रांगोळी स्पर्धेत रुचिता योगेंद्रसिंग सिसोदिया या 12वीच्या विद्यार्थीनीचा प्रथम क्रमांक आला.यावेळी चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे निरीक्षण पी. डी.सोनार सरांनी केले.

WhatsApp
Follow by Email
error: