बातमी कट्टा:- शिरपूर शहर पोलीसांनी छापा टाकला असता वनजमिनीवर भुईमूग आणि मका पिकाच्या आडोश्याला गांजा सदृश्य झाडे पोलीसांना आढळून आली. याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 लाख 86 हजार रुपये किंमतीचा 293 कि.ग्रँ गांजा सदृश्य वनस्पतीचे हिरवे झाडे जप्त करण्यात आले आहे.
शिरपूर शहर पोलीसांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होतीती.त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर यांच्या नेतृत्वाखाली पंचांसहित पथक शिरपूर तालुक्यातील नटवाडे शिवारात दाखल झाले.तेथे पायीपिट करत गेले असता हरचंद जोगी पावरा रा.नटवाडे हे कसत असलेल्या वनजमिनीवर भुईमूंग आणि मकाच्या पिकांमध्ये गांजा सदृश्य ओलसर हिरवे झाडे आढळून आले.पोलीसांनी 5 लाख 86 हजार किंमतीचे 293 कि.ग्रँ गांजा सदृश्य ओलसर हिरवे झाडे जप्त करत हरचंद जोगी पावरा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील कारवाई सुरु आहे.