शेतकऱ्याला मारहाण करत जिवेठार मारण्याची धमकी,

बातमी कट्टा:- शिरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसन्न जयराज जैन त्यांचा भाऊ हर्षल जयराम जैन व पिंटु नामक व्यक्तीने शेतकऱ्याला हातबुक्क्यांनी मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शेतकऱ्याने शिरपूर शहर पोलीस स्टेशनात केली आहे.

तक्रारीत म्हटले की,शहादा येथील शेतकरी नारायण नथ्थु सोनार यांची शिरपूर खुर्द शिवारात 117/4 गट क्रमांकाचे शेत जमीन आहे.त्याचे मशागत नारायण सोनार हे स्वता करतात.दि 5 रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास नारायण सोनार हे शहादा येथून शिरपूर खुर्द शिवारातील शेतातील पीक बघण्यासाठी गेले होते.शेताच्या बांधावर उभे असतांना हर्षल जयराज जैन ,प्रसन्न जयराज जैन व पिंटु पुर्ण नाव माहित नाही असे तेथे आले व काहीएक कारण नसतांना नारायण सोनार यांना म्हणाले की,तु येथे कशाला आला असे सांगुन शिवीगाळ करत हातबुक्क्यांनी मारहाण करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली.नारायण सोनार यांना दुखापत झाल्याने ते शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात
दाखल झाले.व शिरपूर शहर पोलीस स्टेशनात हर्षल जयराज जैन,प्रसन्न जयराज जैन व पिंटु पुर्ण नाव माहित नाही यांच्या विरुध्दात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: