शॉक लागून “मृत्यू”…

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील कळमसरे गावाजवळ शॉक लागल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.विद्युत तारांचे खाजगी काँट्रॅक्ट घेऊन काम करणाऱ्या ईसमाचा मृत्यू झाला आहे.

चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील मजूर विद्युत पोल उभे करण्यासाठी आलेले असतांना मजूर ठेकेदाराला शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.शिरपूर तालुक्यातील अजंदे शिवारात विद्युत तारांचे व पोलांचे खाजगी काँट्रॅक्ट घेऊन काम करत असतांना यशवंत प्रभाकर कोळी वय 39 यांचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घटली आहे. नेमका शॉक कसा लागला याबाबत काही माहिती प्राप्त झालेली नाही.

मात्र त्याचा मुलगा भुपेंद्र यशवंत कोळी हा घटनास्थळी असतांना हा संपूर्ण अपघात घडल्याचे बघितले आहे.त्याच्या म्हणण्यानुसार विद्युत बंद केल्यानंतर काम सुरु केले होते मात्र तरी देखील शॉक लागल्याने मृत्यू झाल्याचे त्याचे म्हणने आहे.मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: