बातमी कट्टा : आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र सरकारकडील विशेष साहाय्य योजनेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील दारिद्रयरेषेखालील अनुसूचित जमातीच्या युवक व युवतींना संगणक (एम.एस.सी.आय.टी) प्रशिक्षण देण्यासाठी 12 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
संगणक प्रशिक्षणासाठी अर्जासोबत जातीचा दाखला, दहावी उत्तीर्ण गुणपत्रक,आधार कार्ड, दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला तसेच शैक्षणिक कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील.
अधिक माहिती व अर्जासाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा, जि. नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.