बातमी कट्टा:- शेतीच्या वीज बिलाच भरणा करूनही वीजपुरवठा खंडित केल्याने वरूळ परिसरातील संतप्त नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या वरुळ येथील उपकेंद्राच्या कार्यालयाला शनिवारी दुपारी कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला.त्यामुळे काही काळ कार्यालय आवारात तणावाचे वातावरण झाले होते.
तालुक्यातील वरुळ परिसरातील वरूळ,भटाणे, भामपूर,तऱ्हाड कसबे,तऱ्हाडी, अंतुर्ली,लोंढरे,जळोद,अभाणपुर आदी शिवारातील शेती वीज पंप धारक काही शेतकऱ्यांनी मागील महिन्यात बीज बिलांचा भरणा केल्यावरही शेती पिकांना शेवटचा पाण्याचा भरणा करीत असताना वीज अधिकाऱ्यांनी अचानक शेती पंपाचे वीज पुरवठा खंडित केल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी वीज वितरण कंपनीचे वरुळ येथील उपकेंद्राच्या कार्यालय गाठले. यावेळी उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता दिनेश माळी यांच्या चर्चा केली.चर्चेदरम्यान तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र वीज बिलांचा भरणा केल्याशिवाय वीज पुरवठा सुरू करता येणार नसल्याची भूमिका अधिकाऱ्यांनी घेतल्याने शेतकरी संतप्त झाले त्यांनी सरळ कार्यालयाला कुलूप ठोकले.तणावाचे वातावरण होत असल्याचे पाहून शहर पोलिसांना खबर देण्यात आल्याने पोहेकॉ अनिल चौधरी,पोना अनिल शिरसाठ, हे पथकासह दाखल झाले.याप्रसंगी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.