बातमी कट्टा:- रागाच्या भरात लहान भावाने सख्या मोठ्या भावावर विळ्याने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली असून या घटनेमागील कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार चोपडा तालुक्यातील मितावली गावातील रहिवासी संदीप प्रताप पाटील व त्यांचा लहान भाऊ सतीश प्रताप पाटील हे वास्तव्यास आहेत. संदिप पाटील आणि सतीश पाटील दोन्ही भाऊ आपल्या पारगाव शिवारात काम करण्यासाठी सोबत गेले होते.या दरम्यान शेतात दोघांमध्ये वाद झाला.या वादात सतीश पाटील याने आपल्या सख्या मोठा भाऊ संदिप यांच्यावर विळ्याने वार केले.यात संदीप यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती सर्वत्र पसरताच घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेतली.यावेळी पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारींसह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते.पोलीसांनी संशयित सतिश पाटील याला ताब्यात घेतले असून अडावद पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही भाऊंमध्ये झालेल्या वादाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.


