बातमी कट्टा:- आयकर विभागाची साखर कारखान्यावर सलग तिसऱ्या दिवशी कारवाई सुरु असून कारवाई बाबत मात्र काही एक माहिती मिळु शकलेली नाही.चौकशीअंती काय समोर येते याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपुर येथील आयान मल्टी ट्रेड कारखान्यावर सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाची कारवाई सुरू माहिती समोर आली आहे.या कारवाईमध्ये नेमकं काय केले जात आहे ? आणि कसली तपासणी केली जात आहे? हे अद्याप समजू शकलेले नाही. संपूर्ण खान्देशात याबाबत उत्सुकता लागून आहे. चौकशीअंती काय समोर येत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याप्रकरणी चौकशी बाबत ना आयकर विभाग काही बोलायला तयार आहे ना कारखाना व्यवस्थापन काही प्रतिक्रिया द्यायला तयार आहेत.माय चौकशी अंती काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.