“स्मार्ट शिरपूरात” चोरांची “सलामी”

बातमी कट्टा:- रात्रीच्या सुमारास घर बंद राहत असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह ३ लाख ८५ हजाराची सोन्याची दागिने लंपास केल्याची धाडसी घरफोडी झाल्याची घटना शिरपूर शहरातील शहरातील निमझरी नाका परीसरात असलेल्या प्रियदर्शन कॉलनीत १६ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.

शहरातील निमझरी नाक्यावरील प्रियदर्शनी कॉलनीत प्लॉट क्र३८ मधील स्वतःच्या दुमजली इमारतमध्ये वरच्या मजल्यावर दुर्गेश डिगंबर सोनवणे हे आपल्या आई व पत्नी सह राहतात. दुर्गेश माळी यांच्या आई आजारी असल्याने त्यांना दोन तीन दिवसांपासून शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान १५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता दुर्गेश माळी दवाखान्यात निघून गेले.तर त्यांच्या पत्नी नातेवाईकांकडे मुक्कामी गेल्या.हीच संधी चोरट्यांनी साधून रात्री ९ ते १६ सप्टेंबर सकाळी १० वाजेच्या दरम्यान घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील ३० हजार रोख रक्कम व साधारणतः १२ तोळे आणि ६ ग्राम वजनाची सोन्याची दागिने चोरुन नेले.
त्यात १ लाख ५० हजार रुपये किंमतीची ६ तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत,५० हजार रुपये किमतीचे १ तोळे वजनाचे सोन्याची ३ कडे,१ लाख रुपये किंमतीच्या ४ तोळे वजनाच्या ४ सोन्याच्या बांगडया, २५ हजार रुपये १ तोळे वजनाचे सोन्याचे कानातील,१५ रुपये किंमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन,१५ हजार रुपये किमतीच्या ५ ग्रॅम वजनाच्या ५ सोन्याच्या लहान अंगठया व ३० हजार रुपये रोख असे एकूण ३ लाख ८५ हजार रुपये किंमतीचे १२ तोळे ६ ग्रॅम सोन्याचे दागीने व रोख रक्कम लंपास केले आहे.
सदर घटना १६ सप्टेंबर रोजी सकाळी दुर्गेश माळी घरी परतल्यावर उघडकीस आली असून शहर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख ,एपीआय गणेश फड पथकासह दाखल झाले.तसेच चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान व फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले होते.या धाडसी घरफोडीमुळे चोरट्यांनी पोलीसांसमोर आव्हान उभे केले असून परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात १६ सप्टेंबर रोजी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास एपीआय गणेश फड करीत आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: