बातमी कट्टा:- पाटबंधारे विभागातील कालवा निरीक्षकाला नाहरकत दाखला देण्यासाठी एक हजारांची लाच स्विकारतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेत कारवाई करण्यात आल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली आहे.याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार तक्रारदार यांची मौजे पिंपळे ता.शिरपूर येथील शेत जमीन लाभ क्षेत्रात येत नसल्याबाबत नाहरकत दाखला कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग धुळे यांच्या कडून तयार करून देण्याच्या मोबदल्यात 1000 रुपयांची लाचेची मागणी केली, त्या अनुषंगाने सापळा कारवाई केली असता पाटबंधारे उपविभाग शिरपूर येथील कालवा निरीक्षक वर्ग 3 तुषार दिलीप दलाल वय 40 रा.पित्रेश्वर कॉलनी शिरपूर यांनी एक हजार रुपयेची लाच स्विकारतांना लाचलुचपत विभागाचे धुळे पथकाने ताब्यात घेत कारवाई केली आहे.

सदर कारवाई धुळे लाचलुचपत विभागाचे सापळा अधिकारी प्रकाश झोडगे,पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.धुळे,सहा. सापळा अधिकारी मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.धुळे,सापळा पथक:- सुनील कुराडे, पोलीस उप अधिक्षक, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे,पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोह/ जयंत साळवे,शरद काटके, कैलास जोहरे, राजन कदम, पुरुषोत्तम सोनवणे, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भूषण खलानेकर,भुषण शेटे,संदीप कदम, महेश मोरे, संतोष पावरा, सुधीर मोरे, गायत्री पाटील ला. प्र. वि. धुळे. आदींनी केली आहे.