बातमी कट्टा:- शेतीच्या वीज बिल भरूनही वीजपुरवठा खंडित केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्राच्या कार्यालयाला शनिवारी कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला होता. त्यामुळे काही काळ कार्यालय आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर पोलीसांच्या मध्यस्थीनंतर संबधीत अधिकारी व शेतकऱ्यांशी चर्चा होऊन तोडगा काढण्यात आला होता. मात्र त्याच दिवशी संबधीत महावितरण अधिकारीने त्यातील एका शेतकऱ्या विरुध्द गुन्हा दाखल केला. शेतकऱ्यांनी जाब विचारला म्हणून खोटा दाखल केला.ही महावितरण विभागाची दडपशाही असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे.आज दि 28 रोजी शिरपूर महावितरण कार्यालयाला येऊन निषेध व्यक्त केला शिरपूर शहर पोलीस गाठत शेतकऱ्यांनी पोलीसांनी निवेदन देत त्या संबधीत अधिकारी विरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
शिरपूर तालुक्यातील वरुळ परिसरातील वरूळ,भटाणे, भामपूर,तऱ्हाड कसबे,तऱ्हाडी, अंतुर्ली, लोंढरे, जळोद, अभाणपुर आदी शिवारातील शेती वीजपंप धारक काही शेतकऱ्यांनी मागील महिन्यात बीज बिलांचा भरणा केल्यावरही शेती पिकांना शेवटचा पाण्याचा भरणा करीत असताना वीज अधिकाऱ्यांनी अचानक शेती पंपाचे वीज पुरवठा खंडित केल्याने शेतकरी संतप्त झाले.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी वीज वितरण कंपनीचे वरुळ येथील उपकेंद्राच्या कार्यालय गाठले. यावेळी उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता दिनेश माळी यांच्याशी चर्चा केली.चर्चेदरम्यान तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र वीज बिलांचा भरणा केल्याशिवाय वीज पुरवठा सुरू करता येणार नसल्याची भूमिका अधिकाऱ्यांनी घेतल्याने शेतकरी संतप्त झाले त्यांनी सरळ कार्यालयाला कुलूप ठोकले.तणावाचे वातावरण होत असल्याचे बघता शिरपूर शहर पोलील स्टेशनचे पोहेकॉ अनिल चौधरी व पोना अनिल शिरसाठ हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.याप्रसंगी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानंतर चर्चा दरम्यान तोडगा काढत शेतकरी घटनास्थळावरुन परतले.मात्र त्याच दिवशी सायंकाळी सहाय्यक अभियंता दिनेश माळी यांनी एका शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत शेतकऱ्यांना माहिती मिळताच बहुसंख्य संतप्त शेतकऱ्यांनी वरुळ येथील महावितरण कार्यालयाचे उपकेंद्र गाठले तेथून सर्व शेतकरी शिरपूर महावितरण विभागाच्या कार्यालयात दाखल झाले.सदर गुन्हा खोटा असून शेतकऱ्यांना दिवचण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.या दरम्यान समाजसेविका सरोज पाटील यांच्यासह भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शिरीष पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत पवार पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विकी चौधरी आदीजण उपस्थित झाले.खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी निषेध व्यक्त सर्वांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन गाठत पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याकडे कैफियत मांडली.सदर गुन्हा खोटा असून संबधीत अधिकारी विरुध्द देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.