बातमी कट्टा:- शिरपूर येथे ११२ वर फेक कॉल करणाऱ्या एका विरुध्द शिरपूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.याने याआधी देखील दोन ते तीन वेळा ११२ वर फेक कॉल करुन ५० लाख २० लाख चोरी झाले असे खोटे कॉल करुन पोलीसांची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहर पोलीसांना दि १७ रोजी डायल ११२ वर दुपारी १५:४१ वाजेच्या सुमारास कॉल प्राप्त झाला होता.शिरपूर शहरातील वरवाडे येथील भारमल हार्डवेअर या पत्त्यावर गुलाब नावाच्या व्यक्तीने कॉल करुन सोने व पैसे चोरी झाल्याचे सांगितले. गंभीर घटना असल्याचे समजताच शिरपूर पोलीस स्टेशनचे संपूर्ण पथक घटनास्थळी दाखल झाले.मात्र घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर स्थानिकांना घटनेबाबत पोलीसांना विचारले असता अशी घटनाच घडली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. याबाबत ११२ वर खोटा कॉल करणाऱ्याची माहिती काढली असता कॉलर गीलाब यांनी यापूर्वी देखील ११२ क्रमांकावर खोटे कॉल केल्याचे पोलीसांना दिसून आले.खोटे बोलून पोलीस प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचे समजल्यानंतर पोलीसांनी खोटा करणाऱ्या गुलाब नावाच्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला पोलीस स्टेशन येथे बोलवले.त्याने स्वताचे नाव गुलाब शेख हबीब मनियार रा.मराठा गल्ली असे सांगितले.घटनेबाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली.याबाबत पोलीस उमाकांत अशोक वाघ गुलाब मनियार विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.