
बातमी कट्टा:- चौकशी अहवाल तहसिलदारांकडे पाठविण्यासाठी तीन हजारांची लाच मागणाऱ्या मंडळाधिकारीला दोन हजारांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तकारदार यांच्या वडीलांच्या नांवे मौजे सोंडले, ता.जि. धुळे येथील शेतजमिन सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन अंतर्गत जामफळ पाया व बुडीत क्षेत्रासाठी संपादित करण्यात आली आहे. तक्रारदार यांना नोकरी मिळविणेकामी प्रकल्पग्रस्ताच्या दाखल्याची आवश्यकता असल्याने त्यांनी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), धुळे यांचेकडे दि.२८.०२.२०२५ रोजी अर्ज केला होता. सदरचा अर्ज चौकशीकामी तहसिलदार, शिंदखेडा यांच्याकडे पाठविण्यात येवुन त्यांनी सदरचा अर्ज पुढील चौकशीकामी छोटु पाटील, मंडळ अधिकारी, भाग तामथरे यांचेकडेस दिला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी छोटु पाटील यांची वेळोवेळी भेट घेवुन त्यांनी सांगितल्या प्रमाणे अर्जाच्या चौकशीकामी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन दिली होती. परंतु मंडळ अधिकारी छोटु पाटील यांनी त्यांच्या अर्जाचा चौकशी अहवाल तहसिलदार शिंदखेडा यांच्याकडे पाठविला नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी दि.१८.०६.२०२५ रोजी मंडळ अधिकारी छोटु पाटील यांची चिमठाणे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांचा अर्जाच्या चौकशीचा अहवाल तहसिलदार शिंदखेडा यांच्याकडे पाठविण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ३,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात तक्रार दिली होती. सदर तक्रारीची दि.१९.०६.२०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता मंडळ अधिकारी छोटु पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळणेबाबतच्या अर्जाचा चौकशी अहवाल तहसिलदार शिंदखेडा यांच्याकडे पाठविण्याकरीता तडजोडीअंती २,०००/- रुपये लाचेची मागणी करुन लाच स्विकारण्याचे मान्य केले होते.
त्यानंतर दि.२०.०६.२०२५ रोजी सापळा कारवाई दरम्यान मंडळ अधिकारी छोटु पाटील यांनी तक्रारदार यांचेकडुन २ हजार रुपये लाचेची रक्कम चिमठाणे येथील मंडळ अधिकारी कार्यालयात स्विकारतांना रंगेहात पकडण्यात येवुन त्यांचे विरुध्द शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.