बातमी कट्टा:- अखेर प्रशासनाने दिलेल्या लेखी अश्वासनानंतर दोन महिन्यांसाठी उपोषणकर्ते शेतकऱ्यांनी स्थगिती दिली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे,आमदार काशिराम पावरा यांनी निधी संदर्भात तर समस्येवर निराकरणासाठी परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी याबाबत लेखी पत्र दिल्यानंतर अकाराव्या दिवशी उपोषणाला स्थिगिती देण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ता डॉ सरोज पाटील व शेतकरी फाऊंडेशनचे मोहन पाटील व गोपल राजपूत हे देखील उपोषणकर्ते शेतकऱ्यांना पाठिंबा देत त्यांच्यासोबत होते.
शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथे गावापासून उत्तरेकडील दिशेकडे जाणारा अमरधाम रस्ता लगत शेतकरी वहिवाट नाला आहे त्या नाल्यामध्ये पाच ते सात नाल्याचे पाणी व शेतीचे पाणी एकत्र येत असते.तेथे आमदार निधीतून 12 लाखांचे काम मंजूर करण्यात आले व तेथे पुलाचे लहान बांधकाम करुन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाव व कचरा साचत आहे. यामुळे ते शेतकऱ्याचा व मजूर वर्गाचा वापर पुर्ण बंद झाला आहे. व यापुढे शेतकऱ्याचा हंगामी माल देखील तेथून काढता येणार नाही.यापूर्वी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम नसून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची हानी नव्हती तरी तेथे काँक्रीटचे पाईप टाकल्यामुळे पुर्ण पणे रस्ता ब्लॉक झाला आहे. यामुळे शेतकऱ्याना मोठी अडचण निर्माण झाली होती.आपल्या मागणीसाठी शिरपूर बांधकाम विभाग,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले होते.मात्र त्यांच्या निवेदनावर दखल घेतली गेली नसल्याने शेतकऱ्यांना उपोषणाचे शस्त्र उपसावे लागले होते.आज दि 18 रोजी त्या शेतकऱ्यांचा अकराव्या दिवसीही उपोषण सुरु होते तर चारही शेतकऱ्यांची प्रकृती खालवली होती.आज अकराव्या दिवशी उपोषणस्थळी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे,गटविकास अधिकारी व बांधकाम अभियंता दाखल झाले होते.
यात अहिल्यापूर येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या काँक्रीट रस्ता व पाईपमोरीच्या ठिकाणी शासनाच्या विविध योजनांपैकी कोणत्याही लेखाशिर्षांतर्गत निधी उपलब्ध झाल्यास सदर ठिकाणी लहान पुलाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर यांनी लेखी पत्र दिले.
याबाबत आमदार काशिराम पावरा यांनी गावालगत अमरधामकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्यावर नवीन स्लॅबड्रेन बंधण्याकरीता स्थानिक ग्रामस्थांची मागणी असल्याने जिल्हाधिकारी धुळे तसेच शासनाकडे पाठपुरावा करुन मंजुर करण्यात येईल व ते काम पुर्ण करण्यात येणार बाबत पत्र देण्यात आले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडे अंदाजे 15 लक्ष एवढ्या निधीची शिफारस करण्यात येऊन निधी मंजूर झाल्यास नवीन स्लॅबड्रेनचे काम करण्यात करण्यात येणार असल्याचे पत्र दिले आहे.
तर उपोषणकर्ते यांनी पत्रावर लेखी दिले की काम पुर्ण होण्यापर्यंत शेतकऱ्यांना निर्माण होत असलेला गाळ काढण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी स्विकारतील व उपोषण पुढील दोन महिन्यांसाठी स्थगित करीत असल्याचे म्हटले आहे.