बातमी कट्टा:- मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील तापी नदीपात्रात एकाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि 8 रोजी सकाळी घडली होती.तापी पुलावर मोटरसायकल कपडे व पाकीट आणि चप्पल मिळुन आले होते.पाकीटात असलेल्या आधारकार्डामुळे ओळख पटली होती.त्यांचा शोध सुरु असतांंना दि १० रोजी तापी नदीपात्रात मृतदेह आढळून आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील सावळदे तापी नदी पुलावर दि 8 रोजी सकाळच्या सुमारास एक मोटरसायकल बेवारस उभी होती. पुलावर मोटरसायकल सोबत टिशर्ट, पाकीट आणि चपला आढळून आल्या असून ये जा करणाऱ्या प्रवासींनी घटनेबाबत शिरपूर शहर पोलीसांना माहिती दिली होती.पाकीटामध्ये पंकज शिवदास पाटील रा.जवखेडा अमळनेर असे आधारकार्ड मिळुन आल्याने नातेवाईकांना कळविण्यात आले होते.नातेवाईक घटनास्थळी दाखल होत शोध कार्य सुरु केले होते.अखेर दोन दिवसांनंतर तापी नदीपात्रात पंकज पाटील यांचा मृतदेह मिळुन आला असून आत्महत्याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.