अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला..

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील काही भागात अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.या वादळी वाऱ्यात मका गहु बाजरी आणि ज्वारी,केळी पिकाचे नुकसान झाले आहे.

शिरपूर तालुक्यात आज दि १ रोजी दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यादरम्यान वादळी वारा मोठ्या प्रमाणात असल्याने तालुक्यातील कुवे,वाडी,वघाडी, अर्थे,विखरण परिसरातील शेतातील उभे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातीँ काही पिक जमिनदोस्त झाले आहेत.या परिसरात मोठ्या प्रमाणात मका,गहु ,ज्वारी,बाजरी केळी पिकाची लाखवड असून या वादळी वाऱ्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

घटनेची महसूल विभागाने तात्काळ पंचनामा करून भरपई मिळावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. आजच्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील किती क्षेत्रातील शेतात नुकसान झाले आहे याबाबत अद्याप ठोस माहिती मिळु शकलेली नाही.

WhatsApp
Follow by Email
error: