अचानक कारचा टायर फुटला अन् दरोडेखोरांचा महामार्गावर फिल्मी स्टाईल थरार…

बातमी कट्टा:- पहाटेच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या कारच्या पुढे लाकडी ठोकळा फेकल्याने कारचा टायर फुटला.कार थांबवून कारला काय झाले हे बघण्यासाठी दोन जण कर बाहेर येताच हिंदी भाषेत बोलणारे तोंडाला कपडा बांधून आलेले 20 ते 25 वयोगटातील अंदाजे सात ते आठ अज्ञात दरोडेखोर कार जवळ आले आणि कार मधील सदस्यांना मारहाण करत बळजबरीने रोकडसह सोन्याचांदीचे दागिने हिसकावून गेऊन पसार झाल्याची थरारक घटना काल दि 4 रोजी पहाटेच्या सुमारास घडली.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले होते.

शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्यापासून दीड ते दोन कि.मी.अंतरावर मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सदर दरोड्याची घटना घडली आहे.याबाबत पोलीस स्टेशनात कैलास भिवसन जाधव रा अशोकनगर सातपूर ,नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,आईंना इंदौर येथे उपचारासाठी दाखल केल्यानंतर इंदौर कडून धुळ्याकडे जात असतांना त्यांच्यासह वाहनात पाच जण प्रवास करीत होते यात दोन महिलांचा देखील समावेश होता.मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बाभळे फाट्याच्या दोन ते दिड किमी अंतरावर झाडाझुडुपांमधून लाकडी ठोकळा फेकल्याने कारचा टायर लाकडी ठोकळ्यावर चढल्याने टायर फुटला.

कारमधील सदस्य भयभीत झाले.कार उभी करून कारला काय झाले हे बघण्यासाठी बाहेर येऊन बघत असतांना सात ते आठ ईसम कार जवळ आले आणि त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली कार चालकाला रस्त्याखाली फेकून दिले.त्या दरोडेखोरांनी कारमधील शोभाबाई यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाचे सोन्याचे मणी मंगळसुत्र व पाच ग्राम वजनाचे कानातील कर्णफुले तसेच जिजाबाई यांच्या गळ्यातील चार ग्राम वजनाचे मंगळसूत्र व पाच ग्राम वजनाचे कानातील कर्णफुले तसेच फिर्यादी कैलास भिवसन जाधव यांचे खिशातील ४१ हजार रुपये रोख चालकाच्या खिशातील १५ हजार रुपये रोकड व कुणालच्या खिशातील १५०० रु रोख असा यात ७३ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने तर ५७ हजार ५०० रु रोख असा एकूण १ लाख ३० हजार पाचशे रुपयांचा ऐवज हिसकावून तेथून ते औद्योगिक वसाहती कडे फरार झाले.सदर दरोडेखोर सात ते आठ असून २५ ते २८ वयोगटातील असल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत चौकशी केली जवळपास असलेले सी.सी.टी.व्ही कॅमेरा तपासणी करण्यित आली.सदर तरुण हिंदी भाषेत बोलणारे असल्याने ते परराज्यातील असावेत असा संशय व्यक्त करण्यात आला.या थरारक घटनेमुळे मात्र कार मधील सर्वच जण भयभीत झाले होते.

WhatsApp
Follow by Email
error: