
बातमी कट्टा:- अचानक लागलेल्या आगीत सुमारे चार एकरातील संपूर्ण उस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांनी धाव घेत अथक प्रयत्न करून आग विझवली असून सदर आगीमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील गिधाडे येथील भालचंद्र देविदास पाटील यांनी गिधाडे शिवारात 4 एक ऊस लागवड केली होती.सदर ऊस तोडणीला आला असतांना 26 जानेवारी 2022 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अचानक ऊसाला आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.गावातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.सदर आग आटोक्यात येईपर्यंत सर्व चार एकर ऊस जळून खाक झाला.या आगीमुळे भालचंद्र पाटील यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.सदर घटनेबाबत महसूल विभागास माहीती देण्यात आल्याने गिधाडेचे तलाठी विलास नागलोद,कृषी सहायक विजय गोसावी यांनी ग्रामपंचायतचे उपसरपंच राकेश पाटील, पोलीस पाटील नारायण वाघ,कृषी मित्र योगेश पाटील आदी ग्रामस्थांच्या उपस्थित पंचनामा केला.
