बातमी कट्टा:- अजंदे खुर्द येथे कोविड -19 प्रतिबंधकात्मक लसीकरण करण्यात आले.ग्रामीण भागात लसीकरणाचे महत्त्व पटवून त्यांना लसीकरणासाठी वेळोवेळी जनजागृती करण्यासाठी लोकनियुक्त सरपंच राजेंद्र पाटील व त्यांच्या साथीदारांनी केले आहे.

आज बुधवार दि 2 रोजी शिरपूर तालुक्यातील अजंदे खुर्द येथे कोविड लसीकरनाचे तिसरे सत्र यशस्वीरित्या पार पडले. ग्रामीणभागात लोकांना लसिकारणाचे महत्व पटवून देत त्यांना लसीकरणासाठी जनजागृती करत लस घेण्यासाठी त्यांचा सतत पाठपूरावा लोकनियुक्त सरपंच राजेंद्र उत्तम पाटील व त्यांच्या मित्र परिवार मेहनत घेत आहे.
लसीकरणासाठी सांगवी आरोग्य प्राथमिक आरोग्य डॉ.सुशिल वारुडे,डाॅ.व्हि.पी कुलकर्णी, एम.आर. नगराळे, जे.वाय.देसले,एस .एम.पाटील व सर्व अधिकारी यांचे सहकार्य लाभले तर ग्रामपंचायतीचे दोन्ही कर्मचारी समाधान पाटील व अनिल वानखेडे यांची मोलाची साथ लाभली.