बातमी कट्टा:- शिरपूर शहरातील शहादा शिरपूर रस्त्यावरील निमझरी ते करवंद नाका भागात रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या दुकान, टपरी व स्टॉल आणि बॅनर्स वर नगरपालिका विभागाने कारवाई करत संपूर्ण रस्ता मोकळा केला.यावेळी काही अतिक्रमणधारकांशी नगरपालिका अधिकारी व पोलीसांमध्ये किरकोळ वाद झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील निमझरी नाका ते करवंद नाका भागात शहादा रस्त्यावरील अतिक्रमीत दुकानी,स्टॉल व बॅनर्स आदींवर शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या वतीने कारवाई करत संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आले.यामुळे संपूर्ण रस्ता मोकळा झाल्याचे दिसून आले आहे.
यावेळी काही अतिक्रमणधारकांनी विरोध केल्याने नगरपरिषदेच्या अधिकारी व अतिक्रमणधारकांमध्ये किरकोळ वाद निर्माण झाला होता.यावेळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांच्यासह पोलीस पथक उपस्थित होते.