अनैतिक देह व्यापार गुन्ह्यातील संशयिताला पोलीसांनी घेतले ताब्यात, पाणीपुरी विक्रीच्या नावाने कुठला सुरु होता धंदा ?

बातमी कट्टा:- अनैतिक देह व्यापार करणाऱ्या राजस्थान येथील संशयिताचा मध्यप्रदेश पोलीसांकडून शोध सुरु होता.त्याचा शोध घेत मध्यप्रदेश पोलीस महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलीस स्टेशन हद्दी पर्यंत पोहचले. याबाबतची माहिती मध्यप्रदेश पोलीसांनी शिरपूर पोलीसांना दिली आणि काही तासात शिरपूर पोलीसांनी त्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत.संशयिताचा शिरपूरात देखील पाणीपुरीचा व्यवसाय आड वारंगनाची दलाली व्यवसाय सोबत कनेक्शन असल्याची चर्चा असून याबाबत मात्र पोलीसांनी दुजारा दिलेला नाही.

मध्यप्रदेश राज्यातील बुरहाणपुर जिल्ह्यातील शिकारपुरा येथे पोलीसांनी २००६ साली रेड लाईट परिसरात धाड टाकली होती.त्या कारवाईत पोलीसांनी एकुण ७ संशयिताविरुध्द गुन्हा दाखल केला होता या कारवाईत चार महिला व तीन पुरुष होते.यातील संशयित राजु ऊर्फ मुलचंद रा.राजस्थान हा फरार होता.त्याचा मध्यप्रदेश पोलीस सर्वत्र शोध घेत होती.याबाबत बुरहाणपुर न्यायालयाने राजु ऊर्फ मुलचंद याच्या विरुध्द परमंट वॉरंट काढले होते.

याबाबत बुर्हाणपुर जिल्ह्यातील शिकारपुरा पोलीस स्टेशनचे असई कुबेरसिंह जारत,महेफुज अली,राजेश,शादाब आदी जणांचे पथक संशयित राजु ऊर्फ मुलचंद याचा सर्वत्र शोध घेत होते.त्याचा मध्यप्रदेश राज्यात शोध घेतल्यानंतर पथक महाराष्ट्र राज्यात आली.महाराष्ट्रातील चोपडा आणि अमळनेर भागात शोध घेतला असता पथकाला संशयित राजु ऊर्फ मुलचंद हा शिरपूर येथे असल्याचे कळाले.

पथकाने तात्काळ शिरपूर शहर गाठले व शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांना याबाबत माहिती दिली.शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे मनोज पाटील,मुकेश पावरा,अमोल पगारे,पंकज पाटील आरीफ तडवी,अनिता पावरा,पौर्णिमा पाटील आदींनी सर्वत्र संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली.मात्र संशयिता बाबत कुठलीही ठोस माहिती नसल्याने शोध घेणे अवघड होत होते.यावेळी शिरपूर शहर पोलीसांनी शिताफीने शोध लावत शिरपूर जवळील शनीमंदीर मागे संशयित राजु ऊर्फ मुलचंद राहत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. आणि अखेर मध्यप्रदेश पोलीस पथकासह शिरपूर पोलीस पथकाने राजु ऊर्फ मुलचंद या संशयिताला ताब्यात घेतले.
शिरपूर शहर पोलीसांनी मुलचंद याला मध्यप्रदेश पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अनैतिक देह व्यापारच्या गुन्ह्यात असलेल्या संशयित शिरपूरात पाणीपुरीचा ठेला चालवतो व त्या आड वारंगनाची दलाली व्यवसायशी त्याचे कनेक्शन असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत मात्र अद्याप पोलीसांनी दुजोरा दिलेला नाही.

WhatsApp
Follow by Email
error: