बातमी कट्टा:- दि 26 जून रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास सरवड शिवारात लामकानी रोडवरील सप्तशृंगी माता मंदीरासमोर 34 वर्षीय ईसम मृत आवस्थेत आढळला होता.रस्ता ओलांडतांना वाहनाने त्याला चिरडल्याचे घटनास्थळावर दिसून आले होते.याबाबत सोनगीर पोलीस स्टेशनात अपघाताची नोंद करण्यात आली होती.त्या गुन्ह्याचा आता पोलिसांनी शिताफीने चौकशी केली असता हा अपघात नसून अनैतिक संबंधातून कट रचून खून केल्याचे उघड झाले आहे.

सरवड येथील संदीपकुमार विश्वासराव बोरसे वय 34 या ईसमाचा दि 26 रोजी रात्री 9 च्या सुमारास सरवड लामकानी रस्त्यावरील सप्तशृंगी माता मंदीरासमोर मृत अवस्थेत आढळला होता.याबाबत सुयोग बोरसे याने पोलिसात अपघाताची नोंद केली होती.सोनगीर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई एन.एम.सहारे हे या गुन्ह्याचा तपास करत होते.
पोलिसांनी गुन्ह्याची सखोल चौकशी सुरु केली होती. पोलीसांना अपघाताच्या ठिकाणी इनोव्हा गाडीच्या लोगोचे व संपरचे तुकडे मिळुन आले होते.यावरून सोनगीर येथील परिसरातील सी.सी.टी.व्ही फुटेजची तपासणी केली असता हॉटेल सुरुची येथील सि.सी.टी.व्ही फुटेजमध्ये एका इनोव्हा गाडीतून 3 जण दारु पिऊन त्या इनोव्हा गाडीने जात असल्याचे दिसले त्या तिघांमध्ये एक जण मयत संदीपकुमार बोरसे सारखा दिसून आल्याने पोलिसांनी तात्काळ सोबतच्या दोघांचा शोध घेतला त्यातील एक राकेश उर्फ दादा मधुकर कुवर कोळी रा.सरवड ता.जि.धुळे व दुसरा शरद दयाराम राठोड रा.पाडळदे ता.जि.धुळे या दोघांना ताब्यात घेतले.

संशयित शरद दयाराम राठोड याचे अनैतिक संबंध असल्याचे मयत संदिपकुमार माहिती होते मयत संदिपकुमार अनैतिक संबधांवरून शरदला राठोडला दारू पिऊन शिवीगाळ करत असे यामुळे राकेश कुवर व शरद राठोड यांनी संदिपकुमारला आयुष्यातून संपवण्याचा प्लँन केला आणि दि 26 जून रोजी संदीपकुमरला पार्टीचा बहाणा करून देवभाने फाट्यावर बोलवले तेथून ईनोव्हा गाडीत तिघेही हॉटेल सुरुची जवळील देशी दारुच्या दुकानावर संदिपकुमारला दारू पाजून मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सरवड फाटयावर घरी पायी जाण्यासाठी सोडून दिले.संदीपकुमर पायी जाण्यास निघाला असता संशयित शरद राठोडच्या सांगण्यावरून संशयित राकेशने याने इनोव्हा गाडीने संदीपकुमरला जोरदार धडक दिली यात संदिपकुमार मरण पावला.
दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत दोघांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अवघ्या चार दिवसात अपघाताचा कसून शोध लावत खूनाच्या गुन्हाचा उलगाडा केल्याने सोनगीर पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.