बातमी कट्टा:- अनैतिक प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन पतीने पत्नीच्या डोक्यात व तोंडावर दगडाने ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना रात्रीच्या सुमारास घडली. संशयित पतीला पोलीसांनी ताब्यात घेतले असून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्री तालुक्यातील डांगशिरवाडे गावातील दिलीप हिराजी सोनवणे वय 52 हा पत्नी मंडाबाई दिलीप सोनवणे, मुला मुलींसह राहतो.दिलीप सोनवणे हा पत्नी मंडाबाई सोनवणे यांच्यावर नेहमीच चारीत्र्याचा संशय घेत असे, गावातील लोकांसोबत अनैतिक संबध असल्याचा पत्नीवर आरोप करत दिलीप सोनवणे पत्नी मंडाबाई सोबत वाद घालत होता.दि 16 रोजी रात्री दिलीप सोनवणे व त्याची पत्नी मंडाबाई सोबत शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते.
रात्री शेतातच त्या दोघांमध्ये वाद झाले.या वादात संतप्त झालेला दिलीप सोनवणे याने पत्नी मंडाबाई यांच्या डोक्यात तोंडावर दगडाने वार करत मंडाबाईचा खून केला. आज सकाळी याबाबत पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक सचिन साळुंखेसह पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळावरुन मंडाबाई हिचा मृतदेह पिंपळनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.
पिंपळनेर पोलीस स्टेशनात पिंटू काळू गायकवाड यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलीसांकडून तपास सुरु असतांना पोलीसांनी मयत मंडाबाई हिचा पती संशयित दिलीप सोनवणे याला ताब्यात घेतले आहे.
