बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारातील मक्याच्या शेतात एकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता ओढणीच्या साहाय्याने पाठीमागे दोन्ही हात बांधून त्याच ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते.याप्रकरणी थाळनेर पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध सुरु असतांना याप्रकरणी पोलीसांनी तीन संशयितांंना ताब्यात घेतले असून अनैतिक संबधातून खून झाल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तरडी शिवारात गोविंद हिरालाल परदेशी यांच्या मक्याच्या शेतात दि २४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अनोळखी कुजलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला होता.मयत व्यक्तीच्या हातावर मुकेश असे गोंदलेले होते तर ओढणीच्या साहाय्याने दोन्ही हात पाठीमागे बांधून त्याच ओढणीने गळा आवळुन जीवे ठार मारण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी थाळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले होते.याबाबत शोध सुरु असतांनाच सदर मयतचे नाव मुकेश राजाराम बारेला वय ३० वर्षे रा.चाचर्या ता.शेंधवा जि बडवाणी मध्यप्रदेश असे असल्याचे निष्पन्न झाले पोलीसांनी बारकाईने शोध घेतला असता गोपणीय माहिती, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण करून घटनेबाबत उलगडा करून सदर खून सुशिल ऊर्फ मुसल्या जयराम पावरा वय ३० रा.होळनांथे,दिनेश ऊर्फ गोल्या वासूदेव कोळी रा.होळनांथे व जितू ऊर्फ टुंगर्या लकड्या पावरा वय २० रा.होळनांथे ता शिरपूर व त्यांची महिला साथीदार आदींनी केले असून त्यांना पोरबंदर गुजरात येथून व होळनांथे येथून ताब्यात घेतले.त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी मुकेश बारेला याचा अनैतिक संबधातून खून केल्याची कबूली दिली आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,थाळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक उमेश बोरसे,बाळासाहेब सुर्यवंशी,कृष्णा पाटील, संजय पाटील, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील रवींद्र माळी,मायुस सोनवणे,अमोल जाधव,सुनील पाटील,महेंद्र सपकाळ,किशोर पाटील, योगेश जगताप, योगेश साळवे,योगेश ठाकूर, चालक कैलास महाजन,किशोर चव्हाण,रफिक शेख,शाम वळवी,संजय धनगर, भुषण रामोळे,ललीत खळगे,मनोज पाटील, दत्तू अहिरे,सिराज खाटीक,योगेश दाभाडे,धनराज मालचे,भटू साळुंखे, हेकॉ पगार व पोशि दिलीप मोरे आदींनी केली आहे.