अनैसर्गिक कृत्य करून बालकाचा खून,संशयिताला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा….

बातमी कट्टा:- 16 मार्च 2020 रोजी एका शेतात अकरा वर्षीय बालकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. तपासादरम्यान या बलाकावर अनैसर्गिक कृत्य करून त्याचे डोळे काढून डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघड झाले होते.शवविच्छेदन अहवाल व डीएनए अहवालानंतर संशयितावर कारवाई करण्यात आली होती.सोमवारी मा.न्यायालयाने संशयिताला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे या संशयाविरुध्द याआधी देखील अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असून त्याच्या अशा कृत्यमुळे त्याच्या कुटुंबाने शिक्षेच्यादिवशीही त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही.

जळगाव तालुक्यातील भोकर गावातील एका शेतात दि 16 मार्च 2020 साली 11 वर्षीय बालकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळुन आला होता.याबाबत पोलीसांकडून चौकशी सुरु असतांना यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील 21 वर्षीय यश ऊर्फ गोलू चंद्रकांत पाटील हा दि 12 मार्च 2020 रोजी एका लग्नसमारंभासाठी भोकर या गावी आला होता.11 वर्षांचा मुलगा लग्नात वाढत असतांना बर्फाचा गोळा खाण्यासाठी बाहेर आला होता. तेथे संशयित यश याने याला मुलाला शौचास जायचे आहे. तू मला  जागा दाखव असे सांगून गावाच्या बाहेर गेला होता.

तेथे संशयित यश ऊर्फ गोलू याने बालकावर अनैसर्गिक कृत्य करुन त्याचे डोळे काढले होते. नंतर डोक्यात दगड घालून बालकाची हत्या केली होती.या प्रकरणी त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले होते.पोलीस निरीक्षक रविकांत स़नवणे यांनी तपास करुन 10 जून 2020 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.या प्रकरणी 12 साक्षीदार तपासण्यात आले.जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांनी निकाल दिली ज्यात संशयित यश ऊर्फ गोलू चंंद्रकांत पाटील याला मरेपर्यंत कारावासाची व दंडाची शिक्षा सुनावली आहे.

विशेष म्हणजे यश ऊर्फ गोलू चंद्रकांत पाटील याने गुन्हा केल्यानंतर त्याला कारागृहात ठेवण्यात आले होते.सोमवारी त्याला जळगाव न्यायालयात हजर करुन शिक्षा सुनावण्यात आली.मात्र त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चताप दिसला नाही.जळगाव जिल्हातील डांभुर्णी येथे देखील असाच गुन्हा त्याने केलेला असून खटला सुरु आहे.

WhatsApp
Follow by Email
error: