बातमी कट्टा:- खराब रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत संबधीत विभागाला वारंवार सांगून देखील दुर्लक्ष करण्यात येत असून पुढील एक महिन्यात रस्त्याची सुधारणा न केल्यास नागरीक व शेतकऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम कार्यालय बाहेर उपोषणाचा ईशारा जि.प.सदस्य संजय पाटील यांनी दिली आहे.
शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रा.संजय पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले की,भाटपुरा गटातील होळनांथे ते बभळाज हा रस्ता पुर्णता खराब झाला आहे.त्यामुळे दैनंदिन दळणवळणासाठी या भागातील शेतकरी व ग्रामस्थांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.होळनांथे ते बभळाज हा रस्ता खुपच खराब असल्यामुळे छोटे मोठे अपघात होत आहेत.या रस्त्यावर जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.हा रस्ता सुधारणेसंदर्भात संबधीत विभागास वारंवार कल्पना देण्यात आली असतांना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.सदर रस्ता पुढील एक महिन्याच्या आत सुधारणा न झाल्यास शेतकऱ्यांसह नागरिकांसोबत जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे कार्यालय बाहेर उपोषणात बसण्याचा ईशारा देण्यात आला आहे.