अन्यथा कार्यालय समोर तीव्र आंदोलनाचा ईशारा…

बातमी कट्टा:- लाभार्थ्यांना नियमितपणे धान्य वाटप न करता दोन तीन महिन्यांत एकच वेळात धान्य वाटप करण्यात येते. कोरोनाकाळात मोफत धान्य देण्याचे नियम असतांना या योजनेपासून वंचित ठेवले होते.यामुळे सदर रेशन दुकानाची चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावा अन्यथा कार्यालया बाहेर आंदोलनाचा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

काल दि 1 रोझी सकाळी शिरपूर तहसील कार्यालय येथील पुरवठा अधिकारी यांना शिरपूर तालुक्यातील मौजे फत्तेपूर (फाॅरेस्ट) येथील ग्रामस्थांनी निवेदन दिले. निवेनात म्हटले की, मौजे फत्तेपूर फाॅरेस्ट येथील रेशन दुकान क्र. १३२ येथे अन्न धान्य सुरक्षा नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. गावातील लाभार्थ्यांना नियमानुसार धान्य वाटप केले जात नाहीत. दोन-तीन महिन्यांनंतर फक्त एकदाच धान्य वाटप करतात. ते पण नियमानुसार देत नाहीत. एका कुटुंबामागे ७-८ किलो धान्य दिले जाते. कोरोना काळात सुद्धा शासनाने लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याचे आदेश दिले होते.परंतु सदर योजनेपासून गावकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले होते. नियमानुसार मागणी केली तर अरेरावीची भाषा वापरतात, तुमचे रेशन कार्ड बंद करू, तुम्हाला जे करायचे असतील ते करून घ्या अशा प्रकारची भाषा वापरण्यात येते.

सदर रेशन दुकानाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांचा दुकान चालवण्याचा परवाना कायमचा रद्द करण्यात यावा मागणीची योग्य ती दखल घेतली नाही तर येणाऱ्या काही दिवसांत सर्व गावकरी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदनावर विक्रम पावरा,काकड्या प्रताप पावरा,सकाराम पावरा,मवाशा पावरा,संजय पावरा,ईदास पावरा,छना पावरा,रामिसर पावरा,भायसिंग पावरा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: