बातमी कट्टा:- तालुक्यातील खंबाळा शिवारात रविवारी रस्ता लुटीचा घटना घडली असून तालुका पोलिसांनी घटने नंतर अवघ्या चार तासात 6 संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून 72 हजार रोख व गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकली जप्त केल्याची कारवाई केली.

रविवारी 14 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास प्रदिप नाभिराज चौघुले रा. रुकडी ता.हातकणगले जिल्हा कोल्हापुर हे ड्रायव्हर व इतर दोन व्यकती सोबत इन्डीगो गाडी क्रमांक GJ 5/ RH8988 गाडीने खंबाळा मार्गे जामन्यापाडा गावी ऊसतोड मजुर घेणे साठी जात असतांना त्यांचे गाडीला खंबाळा गावाचे स्मशान भुमी जवळ दोन मोटार सायकल वरील पाचजण डोक्यात कानटोप्या व तोंड बाधलेले 25 ते 30 वयोगटातील इसमांनी त्यांच्या मो.सा.ली इडीगो गाडीला अडवून इंडीगो गाडीची चाबी काढून प्रदीप चौघुले व ड्रायव्हर रविंद्र पेढारकर यांना ब्लेड लावून धमकी देऊन प्रदीप चौघुले यांचे जवळी 72 हजार रुपये घेऊन पळून गेले होते.

याप्रकरणी शिरपुर तालुका पोस्टेला गुन्हा करण्यात आला होता. सदर घटनेची माहीती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाची चक्रे फिरविली. आणि गोपनीय माहितीवरून अवघ्या चार तासात विनोद गंगाराम भिल,रविंद्र देवीदास भिल,भोजू राजेद्र भिल, सागर गजमल भिल अजय भाऊसाहेब कोळी सर्व रा. नवे लोंढरे व पांडुरंग भगवान भिल रा. नवे भामपुर ता. शिरपुर यांना ताब्यात घेत संशयितांनी लुटलेले 72 हजार रुपये व संशयितांनी गुन्हयात वापरलेल्या मोटार दोन सायकली जप्त केल्या आहेत.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविण कुमार पाटील,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव,उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर अनिल माने यांचे मार्गदर्शना खाली शिरपुर तालुका ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, प8पीएसआय नरेंद्र खैरनार भिकाजी पाटील,पोहेकॉ सुनिल मोरे,चत्तरसिंग खसावत,संजय माळी पोकॉ योगेश मोरे चालक सईद शेख आदींनी केली. पुढील तपास पोकॉ संजय भोई करीत आहेत