बातमी कट्टा:- आईच्या नावाने सुरु होणाऱ्या नेत्र(आय) हॉस्पिटल भुमिपूजनच्या कार्यक्रम प्रसंगी भाषण दरम्यान आईच्या आठवणीने शि.व.न.पाचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल भावूक झाले.आई- वडीलांचे ऋण फेडण्यासाठी आमोदे शिवारात आणखी तिन ते चार प्रोजेक्ट उभे करण्याचा मानस असल्याचे भूपेश पटेल यांनी यावेळी भाषण दरम्यान सांगितले.रसिकलाल पटेल मेडिकल फाऊंडेशन & रिसर्च इन्स्टिट्यूट अंतर्गत आमोदे शिवारात स्व.हेमंतबेन मम्मीजी रसिकलाल पटेल मेमोरियल आय नेत्र हॉस्पिलचे दि 31 रोजी भुमिपजन करण्यात आले.
रसिकलाल पटेल मेडिकल फाऊंडेशन & रिसर्च इन्स्टिट्यूट अंतर्गत शिरपूर शहरालगत आमोदे शिवारात स्व.हेमंतबेन मम्मीजी रसिकलाल पटेल मेमोरियल आय नेत्र हॉस्पिटलचे भुमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते.या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून जि.प.अध्यक्ष तुषार रंधे व शंकरा आय हॉस्पिटल,आनंद येथील युनिट हेड डॉ.किशोर इसई हे उपस्थित होते. तर आमदार काशिराम पावरा आणि उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले.यावेळी जि.प.सदस्य देवेंद्र पाटील, प.स.सदस्य यतिष सोनवणे,आमोदे सरपंच,सौ हर्षालीदेवी रविंद्रसिंग देशमुख,आमोदे उपसरपंच लतादेवी योगेंद्रसिंग राजपूत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आमोदे गावाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात पत्रकार रत्नदीप सिसोदिया हे बोलतांना म्हटले की,पटेल कुटुंब कुठल्याही जातीचा विचार न करता दुरदृष्टी ठेऊन कार्य करतात,आरोग्य विषयी त्यांनी जागृती केली आहे,हे नेत्र हॉस्पिटल निश्चितच खान्देशातील सर्वात मोठे हॉस्पिटल राहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आनंद येथील शंकरानंद आय हॉस्पिटलचे युनिट हेड डॉ किशोर इसई आपल्या भाषणात म्हटले की,आ.अमरिश पटेल यांनी आनंद येथील शंकराचार्य हॉटेलमध्ये टिम पाठवून माहिती जाणून घेतली.त्यानंतर स्वता आमदार अमरिश पटेल आनंद रुग्णालयात येऊन येऊन पाहणी केली व त्यानंतर रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला.शिरपूरला शंभर बेड हॉस्पिटल लवकर उभे करुन ,यापुढे आणखी दोन तीन रुग्णालय उभारावे अशी इच्छा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
यावेळी भूपेशभाई पटेल यांनी आपल्या भाषणात सांगितले की,डोळ्यांचा पहिला कँम्प वकवाड येथे घेतला तेथील 175 जणांचे डोळ्यांची शस्त्रक्रिया करावी लागली.तेव्हा पासून डोळ्यांची किती मोठी समस्या आहे याची जाणीव झाली. आमोदे येथुन आई वडीलांना नेहमी सन्मान दिला त्याचे उपकार फेडण्यासाठी आमोदे परिसरात डोळ्यांचे हॉस्पिटल सुरु करण्यात येत आहे.आमोदे गावाशी जवळचे संबध आहेत.आई वडीलांचे ऋण फेडण्यासाठी प्रयत्न करत असून आमोदे परिसरात तीन ते चार प्रोजेक्ट करण्याचा मानस असून आमोदेकरांनी मदत करण्याची गरज आहे.हे आय नेत्र हॉस्पिटल 200 बेडचे बनविण्याचा प्रयत्न सुरु आहे.मोठ्या शस्त्रक्रिया खर्चातील फक्त 10 ते 20 टक्के खर्च जनतेकडून घेण्यात येईल तर 80 ते 90 टक्के खर्च आम्ही करु असे यावेळी भुपेश पटेल यांनी सांगितले.यावेळी आईच्या आठवणीने भुपेशभाई पटेल भावूक झाले होते.